top of page
Niramay All Posts


विद्यार्थी हेच माझे दैवत
डॉ. हेडगेवार हॉस्पिटल व संवेदना आरोग्य प्रसार केंद्राचे उन्हाळी शिबिर खालकोनी येथे आयोजित करण्यात आले होते. तेथे मी विद्यार्थ्यांना हस्ताक्षर सुधारण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी गेलो होतो. अगदी कमी वेळात ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांनी आपले हस्ताक्षर सुधारण्यासाठी उत्साहाने सहभाग नोंदविला. या शिबिरात मुलांना पथनाट्याचेही प्रशिक्षण देण्यात आले. हे सारे पाहताना नकळत माझे मन नूतन मूकबधिर विद्यालयात जाऊन पोहोचले. प्रत्यक्ष जाता आले नाही, तरी मन कोठेही, कधीही जाऊ शकते, फिरून येते.
Samvedana Event.
Aug 44 min read


आषाढाचे निसर्ग रूप !
नभात दाटली सावळ्या मेघांची छाया धरणीने पांघरली हिरवीगार माया आषाढाच्या सरींनी ऋतू हा नहाला निसर्गाच्या रूपात जीव हा हरपला... आषाढमास म्हणजे कडक उन्हाळ्यानंतर तृप्त झालेल्या धरणीचा आणि निसर्गाच्या अदभूत रूपाचा उत्सव ! आषाढ हा वर्षातला चौथा आणि पावसाळ्याची सुरुवात करणारा महत्त्वाचा महिना आहे. या काळात पावसाळा सुरू होतो, त्यामुळे निसर्गात नवीन चैतन्य निर्माण होते. आषाढ म्हणजे निसर्गाचे अद्भुत आणि बहरलेले रूप ! हा काळ म्हणजे पावसाची संततधार, धुक्याची चादर आणि काळ्याभोर ढगांनी व
Ranjana Pande
Aug 33 min read


वेदनांतून आशेच्या किरणाकडे
"वेदनांतून आशेच्या किरणाकडे: कर्करोग रुग्णांची मानसिक स्थिती आणि समस्या निवारण" गेल्या आठवड्यात एक केस आली... Anxiety ची केस आहे असे डॉक्टरांकडून कळवण्यात आले होते. मी, "काय होते आहे मावशी?" अशी सुरुवात करताच... एकदम खड्या आवाजात, "काही नाही ग, ब्रेस्ट कॅन्सर झालाय... ऑपरेशन करायचे आहे पण तो विचार केला की धडधड वाढते... बाकी कॅन्सरला मी नाही घाबरत..." असे त्या म्हणाल्या. मी तर अगदी आश्चर्याने त्यांच्याकडे बघतच होते. त्यावर पुढचा विनोद स्वतःच करून त्या मोकळ्या झाल्या... "अगं, त
Dr. Vanita Raut Madam
Aug 35 min read


विद्यार्थ्यांसाठी योगाभ्यास
योग जागावा, योग आचरावा, योग रुजवावा घरोघरी ... योग विद्या ही आध्यात्मिक विद्या आहे. योग विद्येचा प्रचार आणि प्रसार शाळा आणि महाविद्यालयांच्या माध्यमातून होणे आवश्यक आहे. कारण यामुळे मुलांची स्मरणशक्ती, एकाग्रता आणि प्रतिकार शक्ती वाढते. उच्चार शुद्ध होतात. मुळात शरीर सुदृढ आणि अंतर्बाह्य निकोप असल्यास सहजच आरोग्य लाभते. म्हणूनच विद्यार्थ्यांना या विद्येविषयी कुतूहल आणि जिज्ञासा निर्माण व्हावी, तसेच योगाभ्यासाची आवड निर्माण व्हावी, यासाठी त्यांना योगाभ्यासाचे महत्व सांगणे अगत्

Rajesh Malode
Aug 33 min read


वृक्षवल्ली... मायेची सावली...
पावसाच्या पहिल्या सरी बरसल्या आणि डॉ.हेडगेवार हॉस्पिटल व संवेदना आरोग्य प्रसार उपक्रमाच्या वतीने वृक्षारोपणाचा संकल्प प्रत्यक्षात उतरला. वैद्यकीय सेवा देण्याइतकेच निरोगी समाज आणि निरामय पर्यावरण घडविणेही आमचे कर्तव्य आहे, या भावनेतून काही औषधी तर काही पिढ्यानपिढ्या मायेची सावली देणारी वृक्षप्रजाती आम्ही जाणीवपूर्वक निवडल्या. झाडे केवळ मातीमध्ये उभी असलेली सजीव रचना नाहीत; ती आपल्या श्वासांची राखण करणारी, निसर्गाशी असलेले आपले अदृश्य नाते जपणारी जीवनरेषा आहेत. कवी शांताराम ख

Smt. Anita Kulkarni
Aug 32 min read


लव्ह युवर लिव्हर
मानवी शरीर हा निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार आहे. या शरीरातील प्रत्येक अवयव महत्त्वाचा असला, तरी काही अवयव असे आहेत की त्यांच्याशिवाय जीवनाची कल्पनाही करता येत नाही. त्यापैकी एक म्हणजे लिव्हर. लिव्हर हा शरीरातील सर्वांत मोठा अंतर्गत अवयव आणि सर्वांत मोठी ग्रंथी आहे. प्रौढ व्यक्तीमध्ये त्याचे वजन साधारण १.२ ते १.५ किलोग्रॅम असते. पोटाच्या उजव्या वरच्या भागात, डायफ्रॅमच्या खाली त्याचे स्थान असते. हृदय आणि फुफ्फुसांनंतर शरीराच्या कार्यक्षमतेत सर्वाधिक महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अ

Dr. Bhavik Changole
Aug 14 min read


आतड्यांचे आरोग्य आणि आहार
शरीराला जिवंत आणि कार्यरत ठेवण्यासाठी ऊर्जा आणि विविध पोषक तत्वांची आवश्यकता असते. ही गरज प्रामुख्याने अन्नातून पूर्ण होते .खाल्लेल्या अन्नाचे रूपांतर ऊर्जा आणि विविध पोषक घटकात करण्याचे अत्यंत गुंतागुंतीचे कार्य पचन संस्थेमार्फत होते.वैद्यकीय भाषेत या पूर्ण पचन संस्थेला गॅस्ट्रोइंन्टेन्स्टाईनल ट्रॅक (जी आय टी) म्हटले जाते .हा ट्रॅक मुखापासून सुरु होवून मल विसर्जनाच्या छतापर्यंत जाणारी लवचिक अंतर्गत रचना असते . संपूर्ण आरोग्याच्या पाया या पचन संस्थेवर आणि विशेषतः आतड्यांवर

Dr. Sandhya Joshi
Aug 16 min read


आपण डॉक्टर का झालो? यापेक्षा आपण डॉक्टर म्हणून कसे घडलो..
मी आणि डॉ. मानसी सहज गप्पा मारत असताना मेडिकल शिकतानाच्या, विशेषतः रेसिडेंट डॉक्टर म्हणून काम करत असतानाच्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला. खरं तर प्रत्येक डॉक्टरकडे रेसिडेन्सीच्या काळातील असंख्य आठवणींचा खजिना असतो. अनेक रुग्णांचे चेहरे आजही स्पष्ट आठवतात. त्यांची नावे जणू मेंदूवर कोरल्यासारखी वाटतात आणि ते प्रसंग आजही डोळ्यांसमोर जसेच्या तसे उभे राहतात. त्या काळात तहान, भूक, झोप यांचे भान राहत नसे. अविरत केलेले काम, झालेल्या चुका, त्यासाठी मिळालेली समज, गुरुजनांकडून मिळाले

Dr. Pradnya Bansod
Aug 13 min read


DHH - Editorial - Aug 2026
आला आषाढ श्रावण आल्या पावसाच्या सरी l किती चातक चोचीने प्यावा वर्षा ऋतू तरी ll बघता बघता वर्षा ऋतूचे आगमन झाले आणि मनाला प्रसन्न करून गेले.सहा ऋतूंची ही अखंड परिक्रमा आपल्या जीवनाला नित्य नवे रंग देत राहते. बदल हेच जगाचे शाश्वत स्वरूप असले, तरी निसर्गाच्या या बदलांमध्ये एक विलक्षण नियमितता आणि शिस्त दडलेली असते. कडक उन्हानंतर येणाऱ्या या पावसाच्या सरी धरतीला आणि मनालाही तृप्त करतात. आज "कवी कालिदास दिन" आणि निरामय या आपल्या आवडीच्या त्रैमासिकाचा नववा वर्धापनदिन. नऊ वर्षांच

Dr. Pradnya Bansod
Aug 13 min read


It was Oral Health Day LAST MONTH
दिवस निघाला की आणि अंथरुणाची घडी केली की सगळ्यात आधी आपण हाती घेतो तो ब्रश आणि टूथ पेस्ट. दात घासले की गरम चहा , कॉफी , दुध ...आणि मग अन्य कामे . म्हणजेच काय तर आधी मौखिक आरोग्यापासुनच आपण दिवसाची सुरुवात करतो. असं म्हणतात की, "Oral health is the basic for general health. "आपल्या संपूर्ण शारीरिक आरोग्याचा पाया मौखिक आरोग्य आहे .हे म्हणणे केवळ वरवरचे नाही तर त्याला शास्त्रीय आधार आणि पुरावे आहेत. आपल्या मुखामध्ये अशा काही जंतूंचा प्रादुर्भाव असतो .जन्मजात असलेले हे जंत

Snehal Wankhade
Apr 103 min read


Stress loop & Your Nervous System
“मी ठीक आहे…” म्हणताना आतून तुटत जाण्याची गोष्ट (stress Loop) जीवनात नवीन काही तरी घडावे, चांगले घडावे, असे वाटणे काही चूक कुठाय ? रोज तोच - तोचपणा असला तर कंटाळा येणारच ना ! यामुळे होतं काय की, आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा क्षण येतो, जेव्हा कामाचा, वेळेचा किंवा अपेक्षांचा ताण इतका वाढतो की, आपल्याला फक्त ओरडावेसे वाटते. हा तणाव म्हणजे जणू आपल्या मनात आलेला एक रुसलेला पाहुणा असतो, जो ऐकून घेण्याऐवजी गोंधळच घालतो. अशा वेळी तरीही तुम्ही कधी स्वतःला म्हटलं असेल

Dr. Vanita Raut
Apr 104 min read


Women Empowerment 2026
तू पथदर्शी ..... तू पथदर्शी, स्वयंसिद्ध तू ,पथदर्शी हो, नव्या मनुसी घडवाया भोग्यवस्तू ना, स्वतंत्र सबला ,पूरक शक्ती पुरुषाला । अन्यायासी झुंज देऊया आश्वासक हो सकलांना सृजनशक्तीची हीच सार्थता, फुलवित फुलवित फुलताना । महिला दिनी स्त्रीचे हे रूप, समाजापुढे प्रस्थापित करताना स्त्रीला “स्व”रूपाची ओळख होणे गरजेचे आहे .आज आत्मविस्मृतीतून येणाऱ्या न्यूनगंडातून चुकीच्या पद्धतीची स्त्री -पुरुष समानता ते मिळवू तर पाहत नाही ना ? याचा विचार होणे अगत्याचे आहे . डायन मेरी चाईल्ड यांचे म
Smt. Ranjana Pande
Apr 103 min read


A saga of hope shaped by faith, devotion, and divine grace.
४८ वर्षांची एक गृहिणी डॉ . हेडगेवार हॉस्पिटल येथे मणक्याच्या शस्त्रक्रियेसाठी दाखल झाली. कमरेखालच्या भागात असह्य वेदना, चालता न येणे आणि सहा महिने जवळजवळ अंथरुणाला खिळलेले जीवन—तिच्या आयुष्याला जणू काळोखाने वेढले होते. याच कुटुंबातील तिचा धाकटा मुलगा काही महिन्यांपूर्वी उजव्या हाताच्या कोपरातील जुनाट अस्थिमज्जासंसर्गामुळे (chronic osteomyelitis) त्रस्त होता. त्याच्यावर Dr. Abhilash Pohokar यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार झाले. अत्यंत कष्टाने आणि टीमच्या अथक प्रयत्नांनी त्याच

Dr. Abhilash Pohokar
Apr 102 min read


Premature Rupture of Membranes
३०-३१ आठवड्याची गर्भवती श्वेता खूप घाबरली होती कारण अचानक तिला योनीमार्गातून पाणी सुटल्यासारखं वाटलं,ती लगेच हॉस्पिटल मध्ये तपासणी साठी आली. तपासणी अंती असे समजले की तिची आम्निओटिक सॅक अकाली म्हणजेच संभाव्य वेळेच्या फारच आधी फाटला आहे त्यामुळे हा असा पाण्यासारखा स्त्राव येणे सुरू झाले आहे. या त्रासामुळे गर्भाशयातील पाण्याची पातळी कमी झाल्यास गर्भाच्या वाढीवर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. आई होण्याचे दिवस मोठे सुखद असतात. पण या दिवसात बाळ जन्माला येईपर्यंत आईला अनेकदा व

Dr. Pallavi Shete
Apr 103 min read


Food Allergies
काही विशिष्ट प्रकारच्या अन्नाबाबत शरीराला वावडे किंवा असोशीपण असणे, त्यामुळे शरीरावर अहितकारक प्रतिक्रिया निर्माण होणे,या स्थितीला अविशिष्ट पदार्थांची, स्थितीची ॲलर्जी असे म्हटले जाते.त्या पदार्थासाठी शरीर अति संवेदनशील असून ते अन्न हानिकारक आहे, अशी प्रतिक्रिया शरीर देते तेव्हा अलर्जीची लक्षणे दिसतात. ॲलर्जी असलेल्या अशा पदार्थांना ॲलर्जन असे म्हणतात. हे सहसा निरुपद्रवी असून काही विशिष्ट जणांना प्रतिक्रिया येतात. या प्रतिक्रिया शिंका येणे,खाज सुटणे, त्वचा लाल होणे, श्वास घेण

Dr. Sandhya Joshi
Apr 103 min read


Healing Architectures
"Healing Architecture: आरोग्य आणि जागेचा संवाद" मानव आणि त्याच्या आजूबाजूच्या जागेचा संबंध हा अत्यंत गूढ आणि संवेदनशील आहे. आपण ज्या जागेत राहतो, चालतो, झोपतो, काम करतो किंवा उपचार घेतो त्या जागेचा आपल्या शरीरावर आणि मनावर खोल परिणाम होतो. वास्तुकला ही केवळ इमारती बांधण्याची कला नसून, ती मानवी मनाच्या आणि भावनांच्या स्वास्थ्याशी निगडित आहे. जेव्हा ही वास्तुशिल्पीय रचना माणसाच्या आरोग्य आणि मानसिक शांततेस पोषक ठरते, तेव्हा तिला "Healing Architecture" असे म्हणतात म्हणजेच आरोग
Dhanashri Pande
Apr 102 min read


Live today - जियो वर्तमान में ...
जीवन 'क्षण-क्षण' से बनता है। इसलिए वर्तमान क्षण का , “ आज” का सही उपयोग करनेवाला व्यक्ति ही जीवन का वास्तविक सत्य और लक्ष्य प्राप्त कर सकता है। वर्तमान का अर्थ है वह समय जो अभी चल रहा है, वर्तमान , आज यह अतीत (बीता हुआ) और भविष्य (आने वाला) के बीच का समय है। वर्तमान का महत्व यह है कि यह एकमात्र ऐसा समय है जिस पर हमारा नियंत्रण है और जिसमें हम कार्य कर सकते हैं। अतीत और भविष्य की चिंता छोड़, वर्तमान (आज) में जीने से मानसिक शांति, कार्यक्षमता में वृद्धि और जीवन का सच्चा आनंद

Jyoti Chandre
Apr 103 min read
bottom of page