top of page

Food Allergies

काही विशिष्ट प्रकारच्या अन्नाबाबत शरीराला वावडे किंवा असोशीपण असणे, त्यामुळे शरीरावर अहितकारक प्रतिक्रिया निर्माण होणे,या स्थितीला अविशिष्ट पदार्थांची, स्थितीची ॲलर्जी असे म्हटले जाते.त्या पदार्थासाठी शरीर अति संवेदनशील असून ते अन्न हानिकारक आहे, अशी प्रतिक्रिया शरीर देते तेव्हा अलर्जीची लक्षणे दिसतात. ॲलर्जी असलेल्या अशा पदार्थांना ॲलर्जन असे म्हणतात. हे सहसा निरुपद्रवी असून काही विशिष्ट जणांना प्रतिक्रिया येतात. या प्रतिक्रिया शिंका येणे,खाज सुटणे, त्वचा लाल होणे, श्वास घेण्यास त्रास होणे,उलट्या, कमी रक्तदाब, गाठी येणे अशा अनेक प्रकारच्या असू शकतात. Food ॲलर्जी का होते?

Food ॲलर्जी (अन्नाची ॲलर्जी) म्हणजे शरीराची रोग प्रतिकार शक्ती (immune system) काही अन्नपदार्थांना चुकीने धोकादायक समजते आणि शरीर संरक्षणासाठी त्यावर प्रतिक्रिया देते.

१) प्रतिरक्षा प्रणालीची चूक प्रतिक्रियाकाही अन्नातील प्रथिनांना शरीर हानिकारक समजते. त्यामुळे शरीर हिस्टामीन (histamine) सारखे रसायन सोडते आणि ॲलर्जीची लक्षणे दिसतात. २) अनुवंशिक कारणे (Genetics)जर आई-वडिलांना ॲलर्जी असेल तर मुलांनाही होण्याची शक्यता जास्त असते. ३) पर्यावरण आणि जीवनशैलीलहानपणी जंतू किंवा वेगवेगळ्या अन्नाशी कमी संपर्क असला तर प्रतिरक्षा प्रणाली जास्त संवेदनशील होऊ शकते व यामुळे अलर्जीची लक्षणे निर्माण होतात यासाठी अनेक घटक कारणीभूत असतात जसे की

१) अनुवंशिकता, २) शारीरिक किंवा मानसिक ताणतणाव. ३) अन्नामध्ये ॲलर्जनचे प्रमाण जास्त असणे. ४) ॲलर्जन असलेल्या अन्नाचा वारंवार उपयोग करणे. ५) एक्झिमा किंवा दमा असणे. अन्नाच्या अलर्जीची लक्षणे

१) ॲलर्जन असलेले अन्न खाल्ल्यावर अंगावर पित्ताच्या गाठी येतात किंवा त्वचेवर पुरळ येते आणि खाज सुटते. साधारण दीड,दोन दिवसात ही लक्षणे आपोआपच नाहीसे होतात २) चेहरा, ओठ, तोंड, जीभ यावर सूज येते. ३) तोंड आणि घशात खवखव होते,खाज सुटते. ४) अन्न गिळायला अडचण येते. ५) आवाजात बदल होतो. घशात घरघर होते. ६) श्वास घेणे बिकट होते. अस्थमा अटॅक यामुळे येऊ शकतो. ७) थकवा, ताणतणाव, डोकेदुखी, सांधेदुखी, अस्वस्थ वाटणे, पोटदुखी ही लक्षणे देखील अशावेळी दिसतात. ८) सतत शिंका येणे, नाक गळणे, चक्कर येणे ही लक्षणे दिसतात. ही लक्षणे व्यक्तीनुसार आणि त्यांच्या गांभीर्यानुसार वेगळी असू शकतात जसे की काही प्रतिक्रिया सौम्य, तर काही तीव्र असतात. निदान: एखाद्या विशिष्ट अन्नपदार्थांचे सेवन केल्यास लक्षणे दिसत असतील तर त्या पदार्थाची अलर्जी आहे का हे ठरवण्यासाठी पुढील मुद्दे विचारात घेतले जातात. १) अन्न खाणे आणि लक्षणे दिसण्यातील अवधी. २) तात्पुरते केलेले उपचार. ३) असे पुर्वी देखील झाले असल्यास. ४) दमा, एक्झिमा असणे. ५) कुटुंबातील इतर सदस्यांनाही अशीच तक्रार असणे. विविध चाचण्या ॲलर्जी स्कीन चाचणी – ॲलर्जन टोचून त्याची होणारी प्रतिक्रिया देखील बघितली जाते. रक्त चाचणी- संशयित ॲलर्जन साठी रक्त चाचणी केली जाते.रक्तातली इम्युनोग्लोबिन लेव्हल तपासूनही अॅलर्जीचे निदान होऊ शकते. फूड चॅलेंज चाचणी- ज्या अन्नाचा संशय आहे, ते खायला लावून त्याचे निरीक्षण केले जाते. पॅच आणि स्क्रॅच चाचणी- यात फिल्टर पेपरवर संशयित टाकून ॲलर्जन स्कीनच्या अंतर्भागात ठेवून त्याचे निरीक्षण केले जाते किंवा कातडीवर ओरखडे ओढून त्यात ॲलर्जन टाकून प्रतिक्रिया निरखली जाते. कोणते पदार्थ ॲलर्जी कारक आहेत?

थंड, अती गोड पदार्थ अती आंबट पदार्थ, शेंगदाणे,अंडी, दुध, काही औषधे, मासे, मांस, गव्हातील ग्लुटेन, तीळ,सोयाबीन, टमाटे, रसाळ फळे, इ. पदार्थ व्यवस्थापन आणि उपचार - हे व्यवस्थापन करताना ज्या अन्न पदार्थातून ॲलर्जी होते,त्या अन्न पदार्थांच्या सेवनापासून दूर राहणे, हा सर्वोत्तम भाग आहे.ॲलर्जी होण्याचा धोका कमी करण्यासठी इम्युनोथेरपी वैद्यकीय सेवेत अंतर्भूत आहे. त्यामुळे ॲलर्जीचा धोका कमी होतो. जर चुकून ॲलर्जी निर्माण करणारे अन्न खाल्यास एपिनेफ्रिन सारखी आपत्कालीन औषधे जवळ ठेवावी. तोंडावाटे इम्युनोथेरपी घेतल्यास ॲलर्जन साठी सहनशीलता वाढते. यात ॲलर्जनचे वाढते डोस दिले जातात. त्यामुळे ॲलर्जी कमी होते. ॲलर्जी टाळण्यासाठी घरगुती उपाय-

कोरफड,कडुलिंब, खोबरेल तेल यांच्या बाह्य वापराने आणि त्यात बॅक्टेरिया आणि दाहक विरोधी त्वचेवर आलेल्या पासून ॲलर्जी पासून मुक्तता मिळते. स्वच्छ वातावरण, तणावमुक्त जीवन, सफरचंद, हळद, कांदे या पदार्थांचा पुरेपूर उपयोग करावा. तसेच वाफारा घेणे, भरपूर पाणी पिणे, नाकात स्प्रेचा उपयोग करणे, गोड दही खाणे, मध पाणी पिणे इ. या केवळ अन्न पदार्थांमुळे होणाऱ्या ॲलर्जीचा उहापोह केला आहे. या व्यतिरिक्त धूर,धूळ,परफ्युम,प्रदूषण जळमटे इ. सारख्या इत्यादींसारख्या घटकांपासून देखील ॲलर्जीचा धोका संभवतो. डॉ. संध्या जोशी आहार तज्ञ


 
 
 

Comments


bottom of page