Women Empowerment 2026
तू पथदर्शी ..... तू पथदर्शी, स्वयंसिद्ध तू ,पथदर्शी हो, नव्या मनुसी घडवाया भोग्यवस्तू ना, स्वतंत्र सबला ,पूरक शक्ती पुरुषाला । अन्यायासी झुंज देऊया आश्वासक हो सकलांना सृजनशक्तीची हीच सार्थता, फुलवित फुलवित फुलताना । महिला दिनी स्त्रीचे हे रूप, समाजापुढे प्रस्थापित करताना स्त्रीला “स्व”रूपाची ओळख होणे गरजेचे आहे .आज आत्मविस्मृतीतून येणाऱ्या न्यूनगंडातून चुकीच्या पद्धतीची स्त्री -पुरुष समानता ते मिळवू तर पाहत नाही ना ? याचा विचार होणे अगत्याचे आहे . डायन मेरी चाईल्ड यांचे मते,” स्त्री ही...