Food Allergies
काही विशिष्ट प्रकारच्या अन्नाबाबत शरीराला वावडे किंवा असोशीपण असणे, त्यामुळे शरीरावर अहितकारक प्रतिक्रिया निर्माण होणे,या स्थितीला अविशिष्ट पदार्थांची, स्थितीची ॲलर्जी असे म्हटले जाते.त्या पदार्थासाठी शरीर अति संवेदनशील असून ते अन्न हानिकारक आहे, अशी प्रतिक्रिया शरीर देते तेव्हा अलर्जीची लक्षणे दिसतात. ॲलर्जी असलेल्या अशा पदार्थांना ॲलर्जन असे म्हणतात. हे सहसा निरुपद्रवी असून काही विशिष्ट जणांना प्रतिक्रिया येतात. या प्रतिक्रिया शिंका येणे,खाज सुटणे, त्वचा लाल होणे, श्वास घेण्यास त्रास...