top of page

It was Oral Health Day LAST MONTH

दिवस निघाला की आणि अंथरुणाची घडी केली की सगळ्यात आधी आपण हाती घेतो तो ब्रश आणि टूथ पेस्ट. दात घासले की गरम चहा , कॉफी , दुध ...आणि मग अन्य कामे . म्हणजेच काय तर आधी मौखिक आरोग्यापासुनच आपण दिवसाची सुरुवात करतो. असं म्हणतात की,

"Oral health is the basic for general health. "आपल्या संपूर्ण शारीरिक आरोग्याचा पाया मौखिक आरोग्य आहे .हे म्हणणे केवळ वरवरचे नाही तर त्याला शास्त्रीय आधार आणि पुरावे आहेत.

आपल्या मुखामध्ये अशा काही जंतूंचा प्रादुर्भाव असतो .जन्मजात असलेले हे जंतू प्रादुर्भाव दोन प्रकारचे असतात . एक चांगले जंतू आणि वाइट जंतू .चांगले जंतू हे अन्न पचनासाठी मदत करतात तर वाइट जंतू हे विविध आजारांना निमंत्रण देतात. उदा. हृदयाचे अनेक गंभीर आजारांचे मूळ ओरल कॅव्हिटी असते.यावरून हे लक्षात येईल की मुख आरोग्याची नीट निगा राखली नाही तर कदाचित आपण गंभीर आजाराला बळी पडू शकतो आणि दाताची समस्या असल्यास दुसरा धोका संभवतो तो म्हणजे गर्भवती महिलांना. वेळेपूर्वी बाळंतपण किंवा कमी वजनाचे बाळ ! म्हणजे मुख आरोग्य किती महत्वाचे आहे, हे यावरून लक्षात येइल. म्हणूनच वर्ल्ड हेंल्थ ऑर्गनायझेशनने आरोग्य समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी जे अनेक आरोग्य दिवस साजरे करण्याचे ठरवले आहे . त्यात जागतिक मौखिक आरोग्य दिन (World Oral Health Day) 2026 हा 20 मार्च रोजी साजरा केला जाईल. 2024-2026 या तीन वर्षांच्या "हॅपी माऊथ" (Happy Mouth) मोहिमेचे हे अंतिम वर्ष असून, त्याची थीम "ए हॅपी माउथ इज अ हॅप्पी लाइफ" (A Happy Mouth is a Happy Life) ही आहे, जी निरोगी दातांचे जीवनावरील सकारात्मक परिणाम दर्शवते व यादिवशी मुख आरोग्य , समस्या आणि निराकरण यासाठी जनजागृती केली जाते.

दातांच्या संदर्भात काही सामान्य प्रश्न सर्वांच्या मनात असतात जसे की, १ ) दिवसातून किती वेळा ब्रश करावा आणि का करावा ? तर सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना असे दोन वेळा तरी ब्रश करणे महत्वाचे आहे. सकाळी उठल्यावर ब्रश केल्याने तोंडाची दुर्गंधी येत नाही.ब्रश करता जीभ देखील स्वच्छ करावी. रात्री ब्रश यासाठी करावा की दिवसभर आपण जे खातो ते अन्नकण दातात अडकले असतात,यामुळे दाताना कीड लागू शकते व cavities तयार होतात. २) वेडेवाकडे दात असतील तर काय उपचार करावेत? आजकाल तरुण तरुणींना बाह्य सौंदर्य महत्वाचे असते. दात आपल्या सौन्दर्याच्या प्रमुख एक आहे कारण वेडेवाकडे दात मुलांना आवडत नाहीत. हसले की आपले दात दिसतात आणि ते वेडेवाकडे असले की ते छान दिसत नाहीत. सुहास्य ही चेहऱ्याचे सौंदर्य द्विगुणीत करणारी बाब आहे. त्यामुळे वेडेवाकडे दात असल्यास दातांना क्लीप लावली जात असे पण आता आधुनिक उपचार पद्धतीत ब्रेसेस , क्लीप लावण्याची गरज नाही,कारण वेडेवाकडे दात लवकर आणि अधिक उत्तम प्रकारे सरळ करणारे इन्विझिबल अलायनर्स आले आहेत. अतिशय उच्च दर्जाच्या प्लास्टिक सारख्या मटेरियलने हे अलायनर्स बनविले जातात. तोंडामध्ये बसविले की सहजी ओळखू न येणारे , पारदर्शक आणि सहज दातात मिसळून जातील असे.ही प्रक्रिया आता खूपच सोपी आणि जलद करणे शक्य आहे. पूर्वीपेक्षा आता टेक्नोलॉजी प्रगत झाली आहे. पूर्वी या गोष्टीला ७ ,८ दिवस लागत असत. आता आता अगदी तासा- दोन तासात ही कॅप बनवता येते. तेही अगदी हुबेहूब दातांसारखी दिसणारी कॅप .सीरामिकमध्ये बनविलेले दात अगदी सहज आपल्या इतर दातात शोभून दिसतात. अगदी आपण दातांचे उपचार केले आहेत, हे कोणाला कळतही नाही.

३) दातांचे उपचार करतांना इंजेक्शन देणार का ? दातांचे उपचार करताना लहान मुल, तरुण असोत किंवा वृद्ध, सगळ्या दंत रुग्णांचा एक प्रश्न डॉक्टरांना असतोच. आम्हाल उपचार करताना इंजेक्शन देणार का ? त्या भीतीने अनेक रुग्ण दंतोपचार टाळतात . पण यामुळे दातांच्या समस्या थोडीच थांबणार ? त्या उलट उशिराच्या उपचाराने वाढतच जातात.या इंजेक्शन ला घाबरण्याची गरज नाही. तसेच भूल दिल्यामुळे वेदनारहित उपचार करणे अधिक सुलभ झाले आहे. ४) दात निरोगी ठेवण्यासाठी काय काळजी घ्यावी? अती थंड किंवा अती गरम पदार्थ खाणे टाळावे. गोड पदार्थ खाल्यानंतर चूळ भरून घ्यावी. व्यसने टाळा-अलिकडे व्यसनांचे प्रमाण खूप वाढले आहे. विविध वयोगटात तमाखू, गुटका , जर्दा , सिगारेट आणि अन्य व्यसन करणारे दिसतात. व्यसनाला बळी पडले की अनेक त्रास आणि आजारांना सामोरे जावे लागते . तोंड न उघडणे, जबडा त्रास देतो, तोंडाला फोड आले आहेत...ही लक्षणे अनेकदा कॅन्सरची असू शकतात. यामुळे वेळीच सावध व्हा आणि व्यसन टाळा. नंतर उपचार घेणे आणि जीवाशी खेळ, त्यापेक्षा आधीच खबरदारी घेतलेली अधिक उत्तम !

नियमित ब्रश करणे, तसेच वर्षातून किमान एकदा तरी दातांची नियमित तपासणी करणे महत्वाचे आहे. आता दातांचे उपचार अधिक सहज, सोपे आणि आधुनिक तसेच कमी वेळाचे , वेदनारहित झाले आहेत. दातांचे दुखणे अंगावर काढू नका,दातांची नियमित काळजी घ्या आणि निरोगी राहा. डॉ. स्नेहल वानखडे दंतरोग तज्ञ


 
 
 

Comments


bottom of page