Premature Rupture of Membranes
३०-३१ आठवड्याची गर्भवती श्वेता खूप घाबरली होती कारण अचानक तिला योनीमार्गातून पाणी सुटल्यासारखं वाटलं,ती लगेच हॉस्पिटल मध्ये तपासणी साठी आली. तपासणी अंती असे समजले की तिची आम्निओटिक सॅक अकाली म्हणजेच संभाव्य वेळेच्या फारच आधी फाटला आहे त्यामुळे हा असा पाण्यासारखा स्त्राव येणे सुरू झाले आहे. या त्रासामुळे गर्भाशयातील पाण्याची पातळी कमी झाल्यास गर्भाच्या वाढीवर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. आई होण्याचे दिवस मोठे सुखद असतात. पण या दिवसात बाळ जन्माला येईपर्यंत आईला अनेकदा विविध त्रासाला...